धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या सेल्फी विथ मेढपाळ अभियानास राज्यभर उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ यांनी दिली.
धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्यावतीने सात ऑगस्ट शुक्रवार पासून मेंढपाळ हे अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या अभियानास आजपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे संघटनेचे पदाधिकारी कोरोना महामारी च्या काळात सामाजिक अंतर ठेवत मेंढपाळाची भेट घेत आहेत. मळके व फाटके कपडे घातलेली मेंढपाळ बांधव मात्र कुणीतरी येऊन आपले अपुलकिने चौकशी करत असल्याचे पाहून भारावून जात आहेत. मेंढ्या चारण्यासाठी येणाऱ्या अडचणी, वन विभाग अधिकारातून टाकण्यात येणारा दबाव आदी गोष्टी बदल पदाधिकारी चर्चा करत आहेत. एकूणच आपल्या पाठीमागे कुणीतरी आहे, आणि त्यांनी आपल्याला सहकार्याचे आश्वासन दिले आहे ही भावना या मेंढपाळ बांधवांत वाढीस लागत आहे. संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशुतोष शेंडगे पाटील, पदेश संपर्क प्रमुख रविकात हारकळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या अभियानात पालम चे तालुकाध्यक्ष तुकाराम डुकरे, येवला जि नाशिक येथील तालुका अध्यक्ष सुरेश पळसकर, ऊमेश हराळ औरंगाबाद, सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव बुट्टे, लातूर जिल्हा अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा शिंदे, औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष एकनाथ आव्हाड, ऊखळी गटाचे प्रमुख मारुती आव्हाड, सांगोल्याचे तालुका कार्याध्यक्ष माने आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. 13 ऑगस्ट रोजी या अभियानात काढण्यात आलेल्या सर्व सेल्फी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात येणार आहेत .तसेच महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे.
COMMENTS