धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यावरील देशी दारूचे दुकान हटवण्याची रमेश चन्द्र तिवारी ची मागणी,

    धर्माबाद (अहमद लड्डा) शहरातील मुख्य रस्त्यावरील देशी दारूच्या दुकानामुळे वाहतुकीस व नागरीकांना,महीलांना मोठी अडचण होत असल्यामुळे सदरील द...


 


 


धर्माबाद (अहमद लड्डा) शहरातील मुख्य रस्त्यावरील देशी दारूच्या दुकानामुळे वाहतुकीस व नागरीकांना,महीलांना मोठी अडचण होत असल्यामुळे सदरील देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


शहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान थाटून बसले आहेत.शहरातील मोंढा रोडवरील व बाळापूर रस्त्यावरील दोन देशी दारूचे दुकाने ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदरच चालू करीत असल्यामुळे सदरील परीसरात तळीरामांनी हैदोस घातल्यामुळे परीसरातील महीला व नागरीकांना डोके दुखी झाली आहे.तसेच काही तळीरामांनी अति देशी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसत आहेत.यामुळे सदरील परीसरातील महीलांना साईबाबा मंदिर,दत्त मंदिर,श्री.स्वामी समर्थ मंदिर व परीसरात असलेल्या शाळेत ये- जा करणाऱ्या बालकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.तसेच बाळापूर रस्त्यावर दोन देशी दारू दुकानासमोर दररोज तळीरामांनी हैदोस घालत असल्यामुळे दैनंदिन व आठवडी बाजाराकडे ये- जा करणाऱ्या महीलांना व पुरूषांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.सदरील देशी दारू दुकानासमोर अनेक वेळा शुल्क कारणावरून तळीरामांचे आपसात भांडणे होत असल्यामुळे परीसरातील दुकानदारांना व रहिवाशी असलेल्या लोकांना नेहमीचीच डोके दुखी झाली आहे.सदरील मुख्य रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत.त्यामुळे सदरील रस्त्यावरून महीला श्री.हिंगोली अंबिका मंदीरात दर्शनासाठी नेहमीच जात असल्यामुळे सदरील महीला परीसरातील देशी दारूच्या दुकानामुळे वैतागले आहेत.लवकरच परीसरातील महीलांनी सुध्दा सदरील देशी दारूच्या दुकानाविरोधात जन आंदोलन करणार असल्याचे अनेक महीलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.गेल्या 28_1_2008 ला तिवारी यानी नादेडच्या दारु बंदी कार्यालय समोर या मागणी साठी ऊपोषण केले होते


अनेक महीलां संघटनांन सुद्धा आवाज ऊचलला होता.परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग व नगरपरीषदेचे काही नगरसेवकांचा पाठबळ सदरील देशी दारूच्या दुकानदारांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली दैनंदिन व आठवडी बाजाराची मागणी पूर्ण झाली आहे.त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली देशी दारूचे दुकाने हटविण्याची मागणी पूर्ण का होत नाही?असा सवाल जनता करीत आहे.सदरील देशी दारूचे दुकानदार कोरोनाचे अटी व नियम पायदळी तुडवून देशी दारूचे दुकाने खुलेआम चालवित आहेत.परंतु सदरील प्ररकरणाकडे स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरातील जनतेतून होत आहे.शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून सदरील देशी दारू दुकानामुळे परीसरातील नागरीकांना,महीलांना,शाळकरी मुला,मुलींना तसेच भाविकांना दर्शनासाठी जात असताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.तसेच सदरील रस्त्यावर तळीरामांच्या गोंधळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे आता परीसरातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.लवकरच सदरील देशी दारूचे दुकाने हटविण्यासाठी काही महीला संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.त्यामुळे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यावरील देशी दारूचे दुकाने हटविण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सदरील मुख्य रस्त्यावरील देशी दारूचे दुकाने हटविण्यासाठी लवकरच नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय ठेवण्यात येणार आहे.सदरील विषयास कुणाचा विरोध व पाठिंबा आहे,हे जनतेच्या लक्षात येणार असल्याचे एका नगरसेवकांनी सांगितले आहे.सदरील मागणीकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लक्ष देण्याची मागणी महीला वर्गातून होत आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group