*परळी तहसीलदारांना दिले निवेदन*
*शिवश्री देवराव लुगडे महाराज*
परळी तालुक्यातील तलाठी हे गाव सज्जावर एक एक वर्षे जात नाहीत आणि गावांमध्ये दाहा पंधरा लाखाचे शासकीय सज्जाचे ऑफिस तयार आहेत पण त्या ऑफिस मध्ये तलाठी कधीच जात नाहीत आज ते ऑफिस भकास अवस्थेत पडले असून त्याठिकाणी गुरेढोरे जनावरे हेच वापर करतात आणि सर्व तलाठ्यांचे ऑफिस परळी शहरात आहेत त्या ऑफिसमध्ये सुद्धा कधीही पाहिलं तर तलाठी गैरहजरच जास्त असतात ऑफिसमध्ये तलाठ्यांनी कामकाजासाठी नौकर माणसं ठेवले आहेत.
ते माणसंसुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्याचेच काम करतात छोट्या छोट्या कामांना सुद्धा त्या ऑफिसला शेतकऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात हा विषय फार गंभीर असून यावरती पंधरा तारखे पर्यंत तलाठ्यांनी कामांमध्ये प्रामाणिक राहून शेतकऱ्यांना सहकारी नाही केले तर *संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल परळी तहसीलच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे *तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज* यांनी दिला आहे.
तसेच शेतीच्या फेरफार साठी सुद्धा अमाप शेतकऱ्यांकडून लाच मागण्याचे काम सर्रास होत आहे जे शेतकरी पैसे देत नाहीत त्यांचे फेरफार सुद्धा लावली जात नाहीत हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे शोषणाच असून शेतकऱ्यांनी त्याला बळी न पडता कोण्याही अधिकाऱ्यांना लाच देऊ नये जर कोण अधिकारी लाच मागत असेल तर *संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करा अशी विनंती सुद्धा शेतकऱ्यांना *देवराव लुगडे महाराज* यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार साहेबांना *संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी *संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज,* संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष *शिवश्री लक्ष्मण दादा गव्हाणे*, नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे तालुका अध्यक्ष *शिवश्री धनंजय महाराज सोळंके*. तडोळी ग्रा. स. *शिवश्री प्रभाकर सटाले* , तडोळी ग्रा. स. *शिवश्री उत्तम सटाले*, युवक नेते *शिवश्री संदीप दिवटे* *शिवश्री महारुद्र गव्हाणे*. या सह पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS