- नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती धर्माबाद - (अहमद लड्डा) दिनांक 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र...
- नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
धर्माबाद - (अहमद लड्डा) दिनांक 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक आदिवासी दिवस म्हणून समस्त आदिवासी जमातीकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नुकत्याच राजस्थान सरकारने जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट 2020 रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावे अशी विनंती जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
COMMENTS