केज: बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, केजचे माजी सरपंच, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात ज्यांनी एके काळी केजसाठी मोठे कार्य केले असे केज चे प्रतिष्ठित मा सुरेश तात्या पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांचे रविवार दि 9 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय साठ वर्षे होते. लक्ष्मीबाई या परिवारातील खूपच प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्या केज शहर व परिसरात परिचित होत्या. पाटील परिवारात येणाऱ्या प्रत्येक गोरगरिबांची काळजी घेऊन त्यांनी सेवा केली. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर मोठे दुःख कोसळले आहे. त्यांच्या मागे पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाटील परिवाराने सोमवारी सकाळी 8 वाजता केवळ परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडले. प्राप्त परिस्थितीचा विचार करता नातेवाईक व हितचिंतकानी स्वतःची काळजी घेऊन सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेट टाळून फोनद्वारेच सांत्वन करावे असे आवाहनही परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS