दिंद्रुड प्रतिनिधी
धारुर तालुक्यातील मोहखेडच्या १८ वर्षीय युवतीचे काविळ या आजाराने रविवारी अकाली निधन झाले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखान्यात याेग्य तो उपचारा अभावी या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राजनंदीनी दत्तात्रय सोळंके वय १८ वर्ष मयत मुलीचे नाव आहे. राजनंदीनी नुकतीच इयत्ता १२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. आठ दिवसांपासून तिला हलकासा ताप व उलटी झाल्याने तेलगांव येथील खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता काविळ झाल्याचे निदान झाले होते, ताप वाढतच राहिल्याने शनिवारी अंबाजोगाई येथिल स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात राजनंदीनी ला दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.कोरोना च्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयाकडुन रुग्णांना संशयित नजरेेने पाहिले जात असुन योग्य ते उपचारा अभावी राजनंदीनी चा मृत्यू झाला असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले असुन शोकाकुल वातावरणात राजनंदीनी वर रविवारी मोहखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजनंदीनी च्या अकाली निधनामुळे मोहखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS