*यूपीएससी परीक्षेत देशातून २२ वा आलेल्या बीडच्या मंदार पत्कीचे धनंजय मुंडेंनी केले अभिनंदन


 


परळी (दि. ०४) ---- : नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालामध्ये देशातून २२ वा आलेल्या बीड जिल्ह्यातील मंदार जयंत पत्की याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 


 


धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून मंदारशी संपर्क करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ट्विट करूनही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


 


आमच्या बीडचा मंदार वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशातून २२ वा आला. त्याचा मला अभिमान वाटतो. देशाच्या सर्वोच्च नागरी सेवेतून मंदारने आपले व जिल्ह्याचे नाव उंचावेल अशी कामगिरी करावी अशा शब्दात ना. मुंडे यांनी मंदारला शुभेच्छा दिल्या आहेत.


 


बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेल्या मंदार याने पुढे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महावितरण मध्ये सेवानिवृत्त झालेल्या जयंत पत्की यांचा मंदार हा मुलगा असून, यूपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांने उल्लेखनीय यश मिळवले आहे.


टिप्पण्या