धर्माबाद -
लॉकडाऊनमध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नंतर संचारबंदी लागू व शनिवार-रविवार पूर्ण दिवस लॉकडाऊन आहे.अशातच रेल्वे गेट नंबर दोन परिसरामध्ये चार ते पाच ठिकाणी दारू विक्री होत आहे.
त्यामुळे तळीरामानी या परिसरात गोंधळ घालताना दिसत आहेत. ह्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.या परिसरातील नागरिक अशा तळीरामामुळे भयभीत झाले आहे .या परिसरामधील धार्मिक मंदिरे असून शनी मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर आणि लहुजी साळवे चौकामध्ये ध्वज आहे. अशा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तळीरामाने गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा या तळीरामांना लवकर आवर न घातल्यास धार्मिक ठिकाणाच्या विषयावरून जातीयवादी दंगल व हाणामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित अवैध धंदे चालवनाऱ्यावर व त्यापरिसरात गोंधळ करणाऱ्या तळीरामावर कारवाई करावी व पूर्णपणे अवैध धंदे बंद करावे, अशी जनतेतून मागणी होत आहे.
COMMENTS