हनुमंत सौदागर दाम्पत्यांना आदर्श ग्रामसेवा पुरस्कार


 


(जलसंधारण , पांदण मुक्तीच्या चळवळीत योगदान)  


केज /रमेश इतापे.


तालुक्यातील आनंदगाव येथील हनुमंत सौदागर, भाग्यश्री सौदागर या पती पत्नी दाम्पत्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ग्रामसेवा कार्याबद्दल अण्णा भाऊ साठे युवा मंच आनंदगाव कडून ग्रामसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 


सौदागर दाम्पत्यांने आनंदगावात जलसंधारण चळवळ राबवण्यासाठी पुढाकार घेतला.शिवारातील पाणी पातळी वाढली गेली.गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी काम केले.सपत्नीक देहदान करून मृत्यूनंतर ही इतरांच्या कामी येण्याचा मार्ग स्वीकारला . गावच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करून तो परिसर सुंदर करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.अशा सेवकार्यात ही जोडी झोकून देऊन काम करतात .या सेवा कार्याबद्दल साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे युवा मंच च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


----------


गावाने माझा केलेला सन्मान हा कामासाठी ऊर्जा देत राहील.आम्हाला चळवळीत गावकरी सहकार्य करतात हा बहुमान त्यांचा आहे. यापुढे कायम ग्रामसेवा करत राहू


 हनुमंत सौदागर 


टिप्पण्या