रमेश इतापे/केज :- पती घरी नसताना केज येथे एका महिलेचा तिच्या सख्ख्या दिरानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
केज येथे समर्थनगर भागात तीन सख्खे भाऊ एका वाड्यात एकत्र राहत आहेत. दि.३ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान पीडित महिलेचे पती घरा बाहेर गेले असताना तिचा सख्खा दिर हा तिच्या खोली समोर आला व तिला म्हणाला की, तुम्ही येथे राहायचे नाही येथुन निघुन जा. तेंव्हा ती त्याला म्हणाले की, आम्ही कोठे जाणार? असे म्हणताच त्याने शिवीगाळ सुरु केली आणि वाईट हेतुने तिचा उजवा हात ओढुन तु माझेशी शारीरीक संबंध ठेव. असे म्हणुन विनयभंग केला.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तिचा दीर याच्या विरोधात गु.र.नं.३०१/२०२० भा.दं.वि. ३५४, ३५४(अ), ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करीत आहेत.
----------
COMMENTS