i
रूग्णांनी आरोग्य सेवेबद्दल केले समाधान व्यक्त
केज
केज तालुक्यात कोविड या विषाणुचा प्रभाव वाढल्याने कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केज येथे पिसेगांव सेंटर या ठिकाणी कोविड रुग्णाची व्यवस्था व त्यांच्यावर उपचार सुरु आहे या कोविड १९ सेंटरवर जेवणाची व तेथील स्वच्छतेची केजचे तहसिलदार दुलाजी मेंढके साहेब, नायब तहसीलदार सचिन देशपांडे व युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांनी ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुणा केंद्रे मॅडम,
डॉ. अस्वले व आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत आज दि. १० अॉगस्ट सोमवार या दिवशी पहाणी करुन तेथे उपचार घेत असलेल्या व्यक्तींशी अस्थेवाईक विचार पुस करुन चर्चा करुन त्यांना मानसिक धिर देण्याचे काम केले अचानक पहाणी केली असता सदर कोविड १९ सेंटर मध्ये रुग्णासाठी देण्यात येणार्या जेवणाची यांनी स्वत: चव घेतली असता सदरिल जेवण चांगल्या प्रतिचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी साफ सफाई, स्वच्छता, जेवण व इतर बाबी चांगल्या असल्याने समाधान व्यक्त करुन पुढे ही अशीच साफ-सफाई, स्वच्छता व चांगल्याप्रकारचे जेवण व येथे उपचार घेत असलेल्या व्यक्तींना योग्य उपचार व मानसिक बळ देण्याची विनंती केली.
COMMENTS