!
धर्माबाद (अहमद लड्डा ) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जेष्ठ पत्रकार कालीदास अंतोजी यांनी धर्मपत्नी सोबत येवून वृक्षलागवड केल्याने त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र(दिंडोरी प्रणित) धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणी आज दिनांक 10 ऑगस्ट 2020 वार पवित्र श्रावण महिन्यातील 3 रा सोमवार या दिवशी केंद्र परिसरात जेष्ठ पत्रकार अंतोजी कालिदास यांनी धर्मपत्नी सोबत येऊन वृक्ष लागवड काळाची गरज ओळखून 2 श्रीफळ (नारळ ) वृक्ष टीगार्ड सह लागवड करण्यात आली.वृक्ष लागवड करतांना रंगनाथ ठाकर नरेश मोरलवर, व्यंकटेश पाशंमवार, संतोष करखेलीकर, कनय्या मंतोड, यांची उपस्थिती होती.
वृक्ष लागवड आणी संवर्धन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य केल्यामुळे परिसरात सर्वत्र कालिदशजी अंतोजी सेवेकरी यांचे कौतुक होत आहे.
COMMENTS