बीड। प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड ने दि. ९ रोजी क्रांती दिनानिमित्त मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी केल्या आहेत.त्या मध्ये बीड जिल्ह्यासाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी विजय दराडे यांची निवड करण्यात आली. विजय दराडे यांची सामाजिक बांधिलकी,संभाजी ब्रिगेड शी मागील दहा वर्षापासून चा प्रवास, २०१० मध्ये संभाजी ब्रिगेड सदस्य,२०१३ मध्ये माजलगाव तालुका कोषाध्यक्ष २०१८ मध्ये माजलगाव तालुकाध्यक्ष आणि विजय दराडे यांची कामगिरी लक्षात घेता पक्ष वाढी साठी त्यांचा प्रयत्न , शेतकऱ्यासाठी आंदोलने , राजकीय वाटचाल ह्या बाबी लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी विजय दराडे यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड करून त्यांना शुभेछ्या दिल्या. शेतकऱ्याच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात, हे ब्रीद वाक्य घेऊन सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रती दिवस चोवीस तास तुमच्या सेवेत असेल असे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना व नवीन पिढीतील तरुणांना विजय दराडे यांच्या कडून सामाजिक बांधिलकीची मोठी अपेक्षा लागलेली आहे. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटक , हैद्राबाद , मुंबई अश्या अनेक ठिकाणावरून सोशल मिडिया आणि फोन कॉल्स,संदेश द्वारे विजय दराडे यांच्या वर शुभेछ्यांचा वर्षाव होत आहे. कोरोना संकटामुळे कुणीही सत्कार करण्याचा आग्रह करू नये तो खर्च समाजासाठी लावावा, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करावे, असा सल्ला जिल्हाध्यक्ष बीड विजय दराडे यांनी संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
COMMENTS