*मुंबई भाजपतर्फे ठिकठिकाणी साजरे होणार श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन*

    ।* *ऐतिहासिक क्षण उत्साहात अनुभवणार मुंबईकर*     अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या मुक्तीच्या पाचशे वर्षाच्या ऐतिहासिक लढ्यानंतर येत...

 



 


।* *ऐतिहासिक क्षण उत्साहात अनुभवणार मुंबईकर*


 


 


अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या मुक्तीच्या पाचशे वर्षाच्या ऐतिहासिक लढ्यानंतर येत्या बुधवारी दि. 5 ऑगस्ट रोजी देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. हा ऐतिहासिक क्षण अध्यक्ष *श्री.मंगलप्रभात लोढा* यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपातर्फे प्रत्येक वॉर्ड मध्ये जोरदाररित्या साजरा करण्यात येणार असून त्याची जोरदार तयारी भाजप कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. भाजपाच्या मुंबईतील सर्व कार्यालयांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. तर अनेक चौकात श्रीरामाचे पूजन करून मुंबईभरात अनेक ठिकाणी लाडू पेढे व मिठाई वाटण्यात येणार आहे.


 


दादर येथे भाजपच्या मुंबई मुख्यालयात (वसंत स्मृती) *गीतरामायणाचा* कार्यक्रम मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री *श्री.देवेंद्र फडणवीस* यांच्या हस्ते 1990 आणि 1992 मधील कारसेवकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येईल.


 


 


*श्री. मंगलप्रभात लोढा* यांच्या क्षेत्रात वाळकेश्वर मधील बाणगंगा येथे उद्या मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी दीपोत्सव आयोजित केला असून तेथील 125 मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात येईल. तर बुधवारी 5 ऑगस्ट रोजी घराघरातुन दिवाळी साजरी साजरी करण्यात येणार आहे. गिरगावात प्रत्येक मंदिरात भूमिपूजनाच्यावेळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण गिरगाव भगव्या ध्वजांनी सजवण्यात येणार आहे.


 


 


उत्तर मुंबईत सर्व नगरसेवक कार्यालये दिव्यांनी सजविण्यात येणार आहेत. बोरिवलीत अनेक चौक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजविण्यात येणार आहेत. बोरिवलीत सहा ठिकाणी घंटानाद करण्यात येणार आहे. सर्व मंदिरात दीपोत्सव करण्यात येणार आहे.


 


उत्तर मध्य मुंबईत सर्व दिव्यांची आरास, आरती, रंगावली, मंदिरांवर पुष्पवर्षाव अशा स्वरूपात श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन साजरे होईल.


 


तर उत्तर पूर्व (ईशान्य ) मुंबईत प्रत्येक विधान सभा क्षेत्रात दोन ते तीन ठिकाणी सुंदरकांड वाचन, भजन कीर्तन असे कार्यक्रम होतील. प्रत्येक भाजप कार्यालयांवर मंदिरांवर दिव्यांची आरास करण्यात येणारं आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी श्रीरामपूजन करण्यात येईल.


 


उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईत प्रत्येक वॉर्ड मध्ये असेच श्रीरामपूजन, मिठाई वाटप, सुंदर कांड वाचन, असे कार्यक्क्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.    


आमदार श्री.अतुल भातखळकर यांच्या क्षेत्रात सर्व भाजप कार्यालयांवर रोहस्नी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आठ ते नऊ ठिकाणी मिठाई वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.


 


आमदार श्री.पराग आळवणी यांच्या क्षेत्रात प्रत्येक चौकात भव्य श्रीरामपूजन आयोजित करण्यात आलेले आहे. पाऊस नसेल तर अनेक ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनाचा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रत्येक चौकात पेढे वाटप केले जाणार आहे.


 


आमदार श्री.राहुल नार्वेकर ठाकूरद्वार येथील श्रीराम मंदिरात दुपारी दीपोत्सवास हजार असतील. येथे आरती करण्यात येईल तर कुलाबा येथे मारुती मंदिरात रात्री मोठी पूजा आयोजित करण्यात आली आहे.


 


घाटकोपर पूर्व येथे आमदार श्री.पराग शाह यांच्या क्षेत्रात भाजप कार्यालयात दुपारी 11 वाजता भव्य श्रीरामपूजन आयोजित केले आहे.


 


 


तर आमदार श्री.प्रसाद लाड यांच्या क्षेत्रात शिव सर्कल येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवरून अयोध्येतील भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1990 आणि 1992 मधील कारसेवकांचे येथे प्रातिनिधिक सत्कारही करण्यात येणार आहेत. शिव परिसरात प्रत्येक मंदिरांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मिठाईचे वाटपही करण्यात येणार आहे.


 


आमदार श्री.सुनील राणे बोरिवली येथे नाटकवाले लेन येथे दुपारी 12 वाजता होणाऱ्या घंटानादास उपस्थित असतील. तर आमदार श्रीमती विद्या ठाकूर त्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमास उपस्थित असतील.


 


आमदार श्री.तामिळसेल्वम यांच्या क्षेत्रात देवी मंदिरात पूजा आयोजित केली आहे. त्याचबरोबर औषधे आणि धान्य वाटपहि करण्यात येणार आहे.


 


आमदार श्री.कालिदास कोळंबकर यांच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यालयात श्रीरामपूजन आयोजित केले आहे. त्याचबरोबर दहा हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे.


 


आमदार श्रीमती मनीषा चौधरी यांच्या क्षेत्रात प्रत्येक वॉर्ड मध्ये लाडू वाटप करण्यात येणार आहे. भाजप कार्यालयांचा संपूर्ण रस्ता रोषणाईने सजवण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी आमदार मनीषा चौधरी यांच्यातर्फे दहाहजार पणत्यांचे वाटप करण्यात येणार आहे.


 


तर आमदार श्री.आर.एन.सिंग हे बांद्रा येथे उत्तर भारतीय संघाच्या श्रीरामपूजन आणि मिठाई वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


 


 


(मिलिंद दोंदे


प्रसिद्धी प्रमुख


  _____________________


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel