रुग्णकल्याण समिती सदस्य रमेश गौड यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी
धर्माबाद-(अहमद लड्डा)
धर्माबाद तालुक्यातील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वरचेवर वाढत चालली आहे ही बाब चिंताजनक असून रुग्णांच्या तपासणी करिता धर्माबाद तालुक्यास 5 हजार अँटीजेंट किट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामीण रुग्णालयाचे आमदार नियुक्त सदस्य रमेश गौड नायगावकर यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे.
धर्माबाद येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक, आधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने अनेक जणांनी कोरोनावर मात केली आहे ही समाधानकारक बाब आहे तसेच तालुका प्रशासन देखील प्रत्येक विषयात अलर्ट आहेच त्यामुळे योग्यवेळी सर्वोतोपरी उपचार मिळत आहेत.
शहर व तालुक्यातील लोकसंख्या पाहता यापूर्वी जिल्हाप्रशासनाने दिलेल्या किट कमी पडत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी यात लक्ष घालून धर्माबाद तालुक्यास 5 हजार अँटिजेंट किट उपलब्ध करून द्यावेत आशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
मतदारसंघाचे आ.राजेश पवार,धर्माबाद चे तहसीलदार,उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
COMMENTS