- कधी नाही ते एका दिवसात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आकडा
- हप्त्यात अर्ध्या शतकाच्या पुढे
माजलगाव/भास्कर गिरी
माजलगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने शहर हादरले असून
माजलगाव शहरा सह ग्रामीण भागात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण निघाले आहेत त्या-त्या ठिकाणणी नागरिकात चिंताचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असतांना बीड जिल्ह्यात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून आठावड्यात माजलगाव शहरा सह तालुक्यात कोरोना विषाणू चे 50 च्या पुढे रुग्ण सापडल्या मुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहरात ज्या परिसरात कोरोना रुग्ण सापडले आहेत तो परिसर शील केला जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरचे कॉम्प्लेक्स ही माजलगाव नगर पालिका चे नगरसेवक अशोक आळणे, पथक प्रमुख शिवहर शेटे यांच्या सह भुजंग गायकवाड,निकित निर्मले,आशिष तुसे,पांडुरंग कुलकर्णी,अख्तर शेख,रंजित रोमन,महेमुद बेग,मच्छिन्द्र गलधर,शिवाजी देशमुख,बालासाहेब भिसे,अनिल चौधरी,प्रकाश शिंदे,राधाकृष्ण इके,भगवान कांबळे, सुधाकर उजगरे,छत्रभुज मिसाळ, अनिल भिसे,सिकंदर खान बडे खान यांनी पत्रे मारून कोरोना निघालेला परिसर शील केले आहे.
बीड,अंबाजोगाई, परळी या तालुक्या सारखे माजलगाव शहरात कोरोना चे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे म्हणून माजलगाव शहरातील नागरिकांनी कोरोना पासून सावध राहणे गरजेचे आहे. नागरीनकाने हलगर्जीपणा केला तर माजलगाव तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडायला वेळ लागणार नाही म्हणून नागरिकाने स्वतःची काळजी घेऊन शासनाला सहकार्य करण्याची सध्या तरी गरजेचे आहे.
---------------------------
माजलगाव शहरात मोटरसायकल वर विनाकारण फिरणारे व काही नागरिक तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत आहेत यांच्या कडून काळजी घेणाऱ्या नागरिकांना धोका नाकारत येत नाही म्हणून पोलीस व महसूल प्रशासनाने यांच्या वर कारवाई करून दंड आकारून आवर घालावा
- नगरसेवक अशोक आळणे
COMMENTS