दिंद्रुड च्या चहा विक्रेत्याचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह

 



दिंद्रुड प्रतिनिधी


 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड च्या एका चहा विक्रेत्यास कोरोना ची लागण झाल्याचे काल सायंकाळी उशिरा स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णावर अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे मोठे महसुली गाव आहे. मेन रोड वर चहा विक्री करणाऱ्या एका चहा विक्रेत्यास कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असुन यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या व्यक्ती ने दिंद्रुड पोलिस स्टेशन, पोलिस पेट्रोल पंप, बुलडाणा अर्बन बँक व शेजारील दुकानदारांना चहा पुरवला असल्याने दिंद्रुड मध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.


टिप्पण्या