तीन वर्षाच्या मुलगा विवाहित महिलेच्या हत्ये प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार आरोपी आहे मोकाट 


-----------------------------


मादळमोही, दि.३० ( संतोष भारती ) :- फुलसांगवी (ता. शिरूर कासार)येथे तीन वर्षाच्या मुलासह


२३ वर्षीय विवाहित महिलेची घातपाताची घटना होऊन चार दिवस झाले. पण एक आरोपीच्या अटकेनंतर तीन आरोपी अध्याप ही मोकाट आहे. याकडे चकलांबा पोलिसांनी दुर्लक्ष आणि आरोपीबरोबर संबंध असल्याने मुलीच्या वडिलांनी या गुन्ह्याचा तपास चकलांबा येथील सपोनि विजय देशमुख कडून काढून घ्यावा अशी लेखी तक्रार दि.२९ जूलै रोजी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. आता एस पी साहेब काय भूमिका घेणार याकडे नातेवाईकांसह पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


      गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे विविध प्रकारच्या अवैध धंदे, बेकायदेशीर वाळू उपसा वाहतूकीमुळे परिसरातील नागरिक, गावकरी नाहक परेशान झाली आहे. वाढत्या गुन्हेगारी मुळे युवा पिढी व्यसनाधीन, महिला अत्याचार, मारहाण घटना वाढ होत आहे. दरम्यान चकलांबा पोलीस कार्यक्षेत्रातील शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी येथील २३ वर्षीय विवाहित महिलेची घातपाताची घटना होऊन तीन दिवस दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे अश्या महिलांची घातपात घटना होत आहे. पण चकलांबा पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आरोपींना अटक करावी, सपोनि देशमुख या पोलीस अधिकारी यांच्या कडून तपास काढून घ्यावा या अश्या मागणीमुळे चकलांबा सर्व पोलिसांची त्याचबरोबर सपोनि ठाणेदार विजय देशमुख यांची कार्यक्षमता संशयास्पद भूमिका स्पष्ट होत आहे. याकडे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात. का अश्या महिला अन्याय, अत्याचार आणि डागाळलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे कानाडोळा करणार का हे त्यांच्या कामकाजातून दिसणार आहे. याकडे नातेवाईक यांचे लक्ष लागले आहे.


चैकट


पोलीस अधीक्षक साहेबांनी विशेष लक्ष द्या - मागणी


-------------------------------


चकलांबा पोलिस ठाण्याच्या हाद्दीत सतत चोऱ्या, दरोड्यांचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बळावली आहे. पोलिस दुर्लक्ष करत असुन फिर्यादी ऐवज आरोप्याचे लाड करत आहेत. त्यामुळे पोलिसा वरील विश्वासहर्ता कमी होत आहे. तसेच स्थानिक पोलीसांसह वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या केवळ स्वार्थी वृत्तीच्या आर्थिक तडजोडीमुळे बेकायदेशीर वाळू उपसा, वाहतूक, अवैध दारूविक्री आणि दारूबंदी केली जात नाही हे वास्तव आहे. तसेच अधिकृत बरोबरच चोरटी दारू निर्मिती विक्री ही मोठी समस्या आहे. याकडे संबधित अधिका-याने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. याला वेळीच चाप लाववा, महिला अत्याचार, अन्याय करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासाठी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी तुम्ही तरी विशेष लक्ष द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऊमेश शिंदे यांनी केली आहे.


टिप्पण्या