खबरदार आता परजिल्ह्यातून केज तालुक्यात प्रवेश कराल तर....!

  परजिल्ह्यातून केज तालुक्यात येणाऱ्या साठी दोन ठिकाणी संस्थानात्मक कोरोंटाईनची व्यवस्था   आता परजिल्ह्यातून गुपचूप केज तालुक्यात प्रवेश करण...


 


परजिल्ह्यातून केज तालुक्यात येणाऱ्या साठी दोन ठिकाणी संस्थानात्मक कोरोंटाईनची व्यवस्था


 


आता परजिल्ह्यातून गुपचूप केज तालुक्यात प्रवेश करणाऱ्यांवर निर्बंध


-----------------------------------------


 


रमेश इतापे/केज :- आता केज तालुक्यात अतिजोखमीच्या जिल्ह्यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीना केज येथे संस्थनात्मक कोरोंताईन करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने केज येथील दोन शाळांत तशी व्यवस्था केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.


 


केज तालुक्यात कोरोना बाधित अतिजोखमीच्या जिल्ह्यातून केज तालुक्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीसाठी मा. जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी


आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे , व त्यातील पोट कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ज्याअर्थी, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार कोव्हीड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) रात्री १२:०० वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. ज्याअर्थी, लॉकडाऊन कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोव्हीड -१९ विषाणूचा प्रसार होऊ नये. या करिता प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने संशयित कोविड बाधित रुग्णांना सक्तीचे संस्थानात्मक कोरोंटाईन करणे आवश्यक आहे. यासाठी केज येथील बीड शारदा इंग्लिश स्कुल आणि विश्वनाथराव कराड महाविद्यालयांच्या या इमारती तेथील आवश्यक त्या कर्मचाऱ्यांसह या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश तहसीलदार यांनी काढावा. 


या इमारती तात्काळ ताब्यात घेण्यात येत आहेत. या पुढे जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वरील प्रमाणे संस्थानात्मक कोरोंटाईन करण्यात येईल. त्यानंतर अशा सर्व व्यक्तींची नियमा प्रमाणे आरटीपीसीआर टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट घेण्यात येईल. संबंधित नगर पंचायत यांनी केंद्रावरील सुरक्षा, पाणी, वीज या सर्व सुविधांची खात्री करावी. यासाठी कर्मचाऱ्यांचे आदेश तहसीलदार यांनी काढावे. केंद्राचे अंतर्गत स्वच्छता व भोजन शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांच्या मार्फत कोवीड-१९ विषयक सर्व सुरक्षेचे पालन करुनच करण्यात यावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी वरील केंद्रांतील सर्वांची रोज दिवसातून दोन वेळा वैद्यकीय तपासणी होईल. याची खात्री करावी. आरटीपीसीआर व स्वॅब तपासणीचे नियोजन करावे. उपरोक्त आदेशाचे अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८६० (४५) याच्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. असा आदेश काढला आहे.


--------------


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel