अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त कौतूकास्पद अभिवादन


 


 


माजलगाव(प्रतिनिधी) 


         अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी 2020 वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यांला जीवनपटाला, विचारांना उजाळा देऊन विविध माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.


   माजलगाव शहरात १०० विद्यार्थ्याना वही पेन, १०० लोकांना मास्क,१०० झाडे व प्रशासकीय कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात अली आहे. अण्णाभाऊच्या लिखाणावर सोशल डिस्टन्स पाळून उजाळा टाकण्याचा प्रयत्न आरेफ खान ,अशोक ढगे यांनी केला.


     आण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणात भटक्या विमुक्तांचे भावविश्व मांडले यात डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, तुरेवाले, भानामतीवाले, फासेपारधी, नंदीवाले, शिकलगार आदींचा समावेश दिसून येतो. एवढेच नव्हे तर शिवाजीचा पोवाडा,रशियन क्रांती युद्ध, जालियनवाला बाग हत्याकांड, भारतीय स्वातंत्र्यलढा, या विषयावर देखील त्यांनी पोवाडे व कवने‌ लिहीली आहे.


 अण्णाभाऊच्या लिखाणाचा केंद्रबिंदू 'माणूस' हाच राहिलेला आहे. ते कधीच जातीच्या बंधनात अडकून राहिले नाहीत. ते आपल्या बरबाद्या कंजारी या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहितात,"माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे.  


 ह्या जन्म शताब्दी निमित्त वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेवून माजलगाव मध्ये वेगळाच आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न अशोक ढगे,व आरेफ खान यांनी घडवून आणला .अण्णाभाऊ यांचे विचार व जन्मशताब्दी वर्ष अल्पसंख्यांक ,कष्टकरी लोकां मध्ये करून व निसर्गमय झाडे लावून एक नवी प्रेरणा निर्माण केली. 


  


 


पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन असल्यामुळे सहाजिकच त्यांच्या विचारांचा पगडा देखील अण्णाभाऊंच्या साहित्य विचारात दिसून येतो. म्हणून त्यांनी आपली फकीरा ही सर्वोत्कृष्ट कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. 


 अशा या थोर महामानवाला जन्मशताब्दी निमित्त त्रिवार वंदन वेगळ्या कौतूकास्पद पद्धतीने आरेफ खान,अशोक ढगे,कैलास अवाड,मुस्ताक कुरेशी,राम कटारे,संदिप भिसे,आलिशेर,सौरव कांबळे,अमोल ढगे नाजेर कूरेशी ,आजम कूरेशी,विजय घनघाव ,वसीम कूरेशी ,व इतर वंदन करूण आदर्श निर्माण केला आहे.


टिप्पण्या