प्रतिनिधी / केज
शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ, दहिफळ ( वडमाऊली ) संचलीत केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथील काळेगाव हायस्कुल या माध्यमिक शाळेच्या २३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य तर ९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यशाची परंपरा कायम ठेवली.
काळेगाव हायस्कुल या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९४.९४ टक्के लागला आहे. शाळेतून अश्विनी अंगद कोठावळे हिने ८६.६० टक्के गुण घेऊन प्रथम, वर्षा कृष्णा चौरे हिने ८४.८० टक्के गुण घेऊन द्वितीय तर हर्षदा हनुमंत पटाईत हिने ८४ टक्के गुण तृतीय क्रमांक पटकावला असून या शाळेत मुलींनी बाजी मारली आहे. तसेच सुहाना बहादुर मुलानी ८३ टक्के, चंद्रसेन अशोक भांगे ८१.८० टक्के, वर्षा विलास कोठावळे ८०.६० टक्के, ज्ञानेश्वर परमेश्वर तांदळे ८०.८० टक्के, नेहा अमोल धिवार, वैभव कचरु धिवार, नंदिनी संतोष मुकादम, साक्षी बाळासाहेब चौरे यांनी प्रत्येकी ७९.८० टक्के तर वैशाली बाळासाहेब भांगे ७९ टक्के या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सखाहरी गदळे, संस्थेचे उपाध्यक्ष व मराठी विषयाचे विषय शिक्षक राहुल गदळे, शाळेचे मुख्याद्यापक आर. एस. मोराळे, सहशिक्षक जी. बी. मिसाळ, के. एस. घुले, पी.एस. भांगे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS