विजयश्री तोंडे हिची नेत्ररोगविजयश्री तोंडे हिची नेत्ररोगतज्ञसाठी निवड 


प्रतिनिधी I धारूर


 तालुक्यातील सोनिमोहा येथील केंद्रप्रमुख सुखदेव तुकाराम तोंडे यांची कन्या विजयश्री तोंडे हिची एम एस नेत्ररोगतज्ञ या वैद्यकीय पदवीसाठी श्री . भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय धुळे येथे निवड झाली आहे . तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे . सोनिमोहा येथे प्राथमिक शिक्षण झालेल्या विजयश्री तोंडे हिचे माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय गडी येथे झाले . तर अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे एमबीबीएस शिक्षण झाले . यावर्षी झालेल्या पीसी नेट परीक्षेमध्ये तिला घवघवीत यश मिळाल्यामुळे तिची नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे . तिच्या यशाबदद्ल धारूरचे नगराध्यक्ष डॉ . स्वरूपसिंह हजारी, डॉ . नवनाथ घुगे, तुकाराम मुंडे , डॉ . ज्ञानोबा मुंडे, डॉ . तुकाराम मुंडे ,डॉ . शिवदास तिडके, पत्रकार महादेव तोंडे, संदिपान तोंडे, परमेश्वर राउत , सरपंच विष्णू आडागळे, आदींनी अभिनंदन केले


टिप्पण्या