पुर्णा: संतोष पुरी(दि.०६ अॉगस्ट) - तालुक्यातील गौर शेत शिवारातील अग्रवाल यांच्या शेतावर सालगडी म्हणून कामास असलेल्या ६५ वर्षीय रुस्तुम भागाजी मस्के या शेतमजुरांचा संशयास्पदरित्या अचानक मृत्यू झाल्याची घटना दि.०२ अॉगस्ट २०२० सकाळी १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास गौर शिवारातील अग्रवाल यांच्या शेतात घडली होती यावेळी आसपासच्या शेतकऱ्यांनी तात्काळ मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालय आणून दाखल केला.यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिश वाकळे यांनी संबंधित मयताचे नातेवाईक आल्यानंतर मृतदेह पोस्ट मार्टमसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवून नंतरच ताब्यात देण्यात येईल असे संबंधितांना सांगितले मयत व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असल्याने नातेवाईक येण्यास बराच कालावधी लागल्याने मृतदेह तब्बल सात तासांच्यावर रुग्णालयात पडून होता. सायंकाळी ०७-०० वाजेनंतर येथिल शासकीय रुग्णालयात तो नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आला.
शासनाच्या नियमाप्रमाणे मयत व्यक्तीच्या मृहदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्ट मार्टम) केल्या शिवाय नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नयें असे सक्तीचे आदेश असतांना नातेवाईकांच्या केवळ एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेऊन बेजवाबदार ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मयत रुस्तुम मस्के यांचा मृतदेह ताब्यात दिलाच कसा ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.सदरील मयत व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेऊन रात्री आठच्या सुमारास कडक जिल्हाबंदीचा आदेश व जागोजाग चेक पोस्ट असतांनाही हिंगोली जिल्ह्यातील सायाळ या त्यांच्या गावी नेऊन मृतदेहावर रात्री १०-३० वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार उरकल्याचे समजते.कोरोना महामारी मुळे राज्यासह मराठवाडा परिसरात ही आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू असतांनाही रुग्णालय प्रशासनाने मयत वृध्द व्यक्ती रुस्तुम मस्के यांच्या मृत्यूचे निदान न करताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन मयताच्या मृत्यूचे निदान न करताच या संशयास्पद मृत्यू प्रकरणावर जास्तच संशयाचे वलय निर्माण केल्याने संबंधित व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू की घातपात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाने या घटनेची नोंद तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकात करायला हवी होती परंतु चुडावा पोलीस स्थानकात घटने संदर्भात अकस्मात मृत्युची साधी नोंद ही नसल्याचे चुडावा पोलीसांनी सांगितले. जिल्ह्यात काटेकोर नाकेबंदी असतांना नाकेबंदी तोडून नातेवाईकांनी मृतदेह परभणी जिल्ह्यातून वाटत लागणाऱ्या चेक पोस्ट पार करून पुर्णा शहरातील झिरो टि पॉईंट-परभणी-वसमत रोडवरील झिरोफाटा-हट्टा-जवळा बाजार-औंढा-हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सायाळ गावात नेला कसा ? पुर्णेतील ग्रामीण रुग्णालयातील बेजवाबदार अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पिएम करण्याचा अधिकार नसला तरीही संबंधित मयताचा मृतदेह परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी का पाठवला नाही ? संबंधित मयताच्या नातेवाईकांचा कोणावर संशय नसला तरीही संबंधित मयत व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण काय ? याचा उलगडा न करता रुग्णालय प्रशासनाने तसाच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून नेमक कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला ? संबंधित मयत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका की कोरोना व्हायरस (कोविड-१९) की घातपात ? याची कुठल्याही प्रकारची चौकशी आता करणार कोण ? नातेवाईकांच्या हवाले मृतदेह देऊन तात्काळ मृतदेहावर रातोरात संस्कार उरकण्याचा उद्देश काय ? पुर्णा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ज्यांनी शासकीय निर्देशांची अवज्ञा करीत पिएम न करताच मयत सालगडी रुस्तुम मस्के यांचा मृतदेह बेकायदेशीर नातेवाईकांच्या स्वाधीन करणारे डॉ.सतिश वाकळे हे यापुर्वी वसमत रुग्णालयात मेडीकल अॉफीसर होते यांच्या काळात वसमत रुग्णालयात मृतदेह उंदरांनी कुरतडल्याचे प्रकरण घडले होते सद्या हे डेपोटेशनवर शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा येते कार्यरत आहेत दि.०२ अॉगस्ट २०२० रोजी घटनेच्या दिवशी रुग्णालयाचा पदभार यांच्याकडेच होता यांनी मयत मस्के या व्यक्तीचा पिएम तर सोडाच साधी कोरोना टेस्ट (रॅपिड अँटिजेन टेस्ट) सुध्दा न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला शासनाने प्रत्येक रुग्णालयांना सक्तीचे आदेश आहेत कोणताही मृतदेह पिएम केल्या शिवाय नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये मग संबंधित वैद्यकीय अधिकारी वाकळे यांनी मृतदेह ताब्यात दिला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत असून मयत मस्के यांच्या मृत्यूचे मुळ कारण वैद्यकीय अधिकारी डॉ.वाकळे यांच्या बेजवाबदारपणा मुळे गुलदस्त्यातच असल्याचे निदर्शनास येत आहे....
--------
गौर येथिल त्या सालगड्याच्या मृत्यू प्रकरणी प्रस्तुत प्रतिनीधीने चुडावा पोलीस स्थानकाचे सपोनि.शिवाजीराव देवकते यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालय प्रशासन अथवा त्या सालगड्याच्या मालकाने आमच्या ठाण्यात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याने या प्रकरणी कोणतीही नोंद नसल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
-----------
रुस्तुम मस्के यांच्या संशयीत मृत्यु प्रकरणी गुढ वाढत असल्याने त्या मयताबाबत माहीती घेण्यासाठी पुर्णा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गाडेकर व त्या दिवशी ड्युटीवर असलेले डॉ.वाकळे यांच्याशी संपर्क साधला असता ते नाॅटरिचेबल आढळून आले.
COMMENTS