दिंद्रुड / प्रतिनिधी
दिंद्रुड येथिल कोरोना बाधित रुग्णाने कोरोना वर मात केल्याने आज त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. सुट्टी झाल्यानंतर सहीसलामत घरी आलेल्या ६४ वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकाचे गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.
मागील आठवड्यात दिंद्रुड येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून अंबाजोगाई च्या स्वाराती मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. आता त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आले. कोरोना संकटापासून सहीसलामत स्वगृही परतल्यावर दिंद्रुडच्या आरोग्य विभाग, पोलिस, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वागत त्यांचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.
दिंद्रुड ता.माजलगाव येथिल एका चहा विक्री करणाऱ्या व्यक्तीचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल ३१ जुलै रोजी आला होता. दिंद्रुड येथे पहिल्यांदाच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण गाव स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते. १२ दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाने कोरोना वर यशस्वी मात केल्याने दिंद्रुड करांनी आनंद व्यक्त केला.
रुग्णाचे घरासमोर सामाजिक अंतर पाळत दिंद्रुड पोलिस, आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णावर फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.यावेळी दिंद्रुड पोलिस ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर,आरोग्य सेविका कीर्तीताई व्यवहारे, प्रमिला तगारे,आशा वर्कर मंदा देशमाने,पत्रकार बंडु खांडेकर,संतोष स्वामी, नागेश वकरे,ज्येष्ठ नागरिक बबन गौंडर यांच्या सह गावातील प्रतिष्ठीतांनी स्वागत करत कोरोना वर मात केलेल्या रुग्णाला दिलासा दिला.
COMMENTS