घरफोडी करताना चोरटे
संरक्षण भिंतीच्या काचा लागून जखमी
परिसरात चोरांच्या रक्ताने माखलेल्या पावलांचे ठसे
----------------------------------
रमेश इतापे/केज :-
केज मधे काल दू:खद घटना घडली प्राध्यापक लक्ष्मणराव डोईफोडे उर्फ आन्ना यांचे दू:खद निधन झाले. त्यांच्या केज येथील माधव नगर येथील निवासस्थानाचे कूलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. परंतु सतर्क नागरिकांच्यामुळे आणि ऐनवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे चोरानी घटनास्थळा वरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पळून जाताना संरक्षण भिंतीच्या काचा लागून चोर जबर जखमी झालेले आहेत. हे घटना स्थळी पडलेले रक्ताचे व पावलांचे ठसे यावरून दिसून येते. घटनास्थळावरुन कूलूप तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या पंक्चर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन टांब्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या चोरीच्या प्रयत्नातील गून्हेगार जखमी असल्याने त्यांचा तपास केल्यावर हाती लागू शकतात. त्यामुळे परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील चोरटे आणि मुद्देमाल हाती लागूं शकतो. सदर प्रकरणी अतुल लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ३०६/२०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS