शहरातील मारवाडी समाजातील जेष्ठ समाजसेवक नथुलाल सेन यांचे दुःखद निधन
पूर्णाशहरातील समाजसेवक तथा शिवसेना कार्यकर्ते राजु
सेन यांचे ते वडील होते
पुर्णा संतोष पुरी (दि.६ आॕगस्ट) - शहरातील मारवाडी समाजातील जेष्ठ समाजसेवक नथुलाल रामेश्वर सेन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दापकाळाने दि.०३ अॉगस्ट २०२० रोजी दुःखद निधन झाले.
शहरातील जनसामान्यांचे काकाजी म्हणून ते प्रसिध्द होते अत्यंत मनमिळावू स्वभाव तसेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे नथुलाल काकाजी यांच्या अकाली निधना मुळे मारवाडी समाजासह सर्वसमाज बांधवांतून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर शहरातील पुर्णा नदीकाठी असलेल्या हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,तिन मुल,एक मुलगी,नातवंड असा मोठा परिवार असून शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश सेन यांचे ते वडील होते...
COMMENTS