किल्लेधारुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कीटकनाशके कृषी विभागाच्या सल्ल्याने वापर करावे असे आवाहन


किल्लेधारूर(वार्ताहर)तालुक्यात कापूस पीकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.सध्या पीकाची परिस्थिती चांगली असून रसशोषन करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात दिसून येते आहे. त्यावर कृषी विभागाच्या सल्ल्याने शिफारस केलेली किटकनाशक चा वापर करावा. याच बरोबर कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या क्राॅपसॅप सर्व्हक्षण मधून असे निदर्शनास आले आहे की गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव काही ठीकाणी आठवून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी चा उपाययोजना कराव्यात.यात प्रथम गुलाबी बोंड अळी चे कामगंध सापळे एकरी चार उभा करावीत. यामुळे नर पतंग सापळ्यात अडकतील व आपल्याला प्रादुर्भाव प्रमाण लक्षात येईल.तसेच येथून पुढील प्रत्येक रसशोषण किडी साठी किटकनाशक फवारणी करताना गुलाबी बोंड अळीसाठीचे किटकनाशक मिसळून फवारणी करावी.यासाठी


प्रोफेनोफाॅस ५०% ईसी, किंवा फेनप्रोपॅथीन १०%ईसी, किंवा थोयोडीकार्ब ७५%डव्लूपि, किंवा पाॅयरीप्राॅक्झीफेन ५%+ फेनप्रोपॅथीन१५%, किंवा इंडाक्झाकार्ब १४.५%+असिटामाप्रीड७.७%, ई. किटकनाशकांचा अल्टून पाल्टून वापर करावा.


तसेच ज्याठिकाणी हलक्या जमिनीत पाणी लागले आहे त्या शेतकऱ्यांनी काॅपर आॅक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची अळवणी व फवारणी करावी,तसेच साचलेले पाणी काढून द्यावे.तसेच अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रिय कर्मचारी व कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज