(दोषी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी ) केज दि १०(प्रतिनिधी) तालुक्यातील माळेगाव येथील महिला सरपंच प्रिया किशोर भालेराव यांना माहीत नसताना...
(दोषी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी )
केज दि १०(प्रतिनिधी)
तालुक्यातील माळेगाव येथील महिला सरपंच प्रिया किशोर भालेराव यांना माहीत नसताना त्यांच्या खोट्या सह्या करून ठराव घेण्यात आला.24/9/19 रोजीच्या ठरावात खोट्या साह्य कोणी केल्या?सदरील प्रकारास श्री पटाईत हे ग्रामसेवक जबाबदार आहेत प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्याकडे करण्यात आली आहे
सदरील प्रकार हा लोकनियुक्त महिला सरपंच यांचा अवमान आहे.या गंभीर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रिया भालेराव यांनी केली आहे
----------------------
सदरील प्रकाराचा अहवाल मागविण्यात आला आहे चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
श्री दराडे
गटविकास अधिकारी केज
------------------------
COMMENTS