गावकऱ्यांच्या वतीने 30 हजाराचे बक्षीस
धर्माबाद (अहमद लड्डा)
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नागमणी हिने कुठलीही ट्युशन नसताना अत्यंत बिकट परिस्थितीत जिद्दीने मेहनतीने 89% घेऊन जि परिषद येताळा शाळेत प्रथम येण्याचा मान राखला आहे
मार्च 2016 यावर्षी नागमणी ची मोठी बहीण कुमारी संगीता 73%टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान राखला होता
उपक्रमशील शिक्षक शिवकुमार पाटील यांनी चालू केलेली शाळेतली ही बक्षिस परंपरा गावकरी व शिक्षकांनी समोर चालू ठेवली
आकाश रेडी शिवसेना तालुकाप्रमुख यांच्या वतीने 11 हजार रुपये, राजे रेड्डी राम रेड्डी यांच्या वतीने rs.5000,डाॅ लिंगा रेड्डी अकिलवार, यांच्यावतीने पाच हजार रुपये ,डाॅ विठ्ठल रेड्डी कोपरोड यांच्यावतीने rs.5000, डॉक्टर राजेंद्र मुधोळकर यांच्या वतीने पाच हजार असे एकुण तीस हजार रुपयाचे बक्षीस प्रथम येणाऱ्या मुलामुलींसाठी ठेवलेले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने साईनाथ मुतनवाड व सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे गोल्ला गोलेवार समाजातून तालुक्यात प्रथम आल्याबद्दल गोल्ला गोलेवार समाजाच्या वतीने नागमणी भुरोड चा सत्कार देविदास बिपटवार ,कैलास चंदोड यांच्यावतीने करण्यात आला
व शुभेच्छाही देण्यात आल्या
ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेतून कुठल्याही सुविधा नसताना कुमारी नागमणी ने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण गावकर्यातून तिचं कौतुक केले जात आहे.
COMMENTS