उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन
माजलगाव/प्रतिनिधी
कास्तकारांच्या ताब्यातील गायरान जमिनीचा पीक पेरा घेवून 7 /12 नावे करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली दि. 10 सोमवार रोजी येथील उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील मौजे देवळा (खु) येथील अनुसूचित जाती व जमातीचे लोक 1 एप्रिल 1978 ते 2020 पर्यंत शासकीय जमीन गट.नं.5 व 6 नांगरणी,पाळी, पेरणी करुन कसत असून 1978 सालापासून ते आजतागायत नियमितपणे पीकाचा पेरा घेत आलेले असून त्याची लेखी व तोंडी स्वरूपात मंडळ अधिकारी उपविभाग माजलगाव,तहसीलदार साहेब माजलगाव यांच्याकडे पाठपुरावा केला.यापूर्वी तत्कालीन मंडळ निरीक्षक बोर्डेे यांनी पीक जप्ती पंचनामे केलेले आहेत.
महसूल व वन विभाग मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण 2019/प्र.क्र.102/ज.7 अ. दि.7 ऑगस्ट 2019 चे अन्वये तहसीलदार माजलगाव यांना दि.01/01/ 2020 रोजी कास्तकारांच्या ताब्यातील गायरान जमिनी नावे करुन देणे बाबत प्रकरणात नियमा नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाही बाबत अहवाल कार्यालयास सादर करावा असा आदेश असतांना कार्यालयाकडून कोणतीही दखल घेतली नसून तलाठी सज्जा उमरी यांनी कास्तकारांच्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करुन देणे बाबत पत्र क्र.2018 जमा-2/कावि-118 दि.10/09/2018 रोजी पत्र दिले असून त्यामध्ये अर्जदार राजाराम लिंबाजी कीर्तेे व इतर यांचा 03/ 09/2018 रोजीच्या अर्जावर आपल्या स्तरावर नियमाधीन आवश्यक कार्यवाही करुन संबधितास अवगत करुन अनुपालन अहवाल कार्यालयास कळवण्यात यावा असा आदेश असतांना मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कोणतीही कार्यवाही केली नसून आमच्या शेतातील पिकांचा पेरा नोंद केला नाही.यामुळे आम्हा शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी कुठल्याही बँकेकडून पीक कर्ज मिळत नाही,अथवा शेतकऱ्यांच्या कोणत्याही सवलती मिळत नाहीत. म्हणून गायरान जमिनीचा पीक पेरा नोंद घेवून शेत जमीन नियमानुसार करुन 7/12 देण्यात यावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव यांच्या कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हाअध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी राजाराम लिंबाजी कीर्तेे, भानुदास मल्हारी शेळके,दगडू विठ्ठल कीर्तेे यांच्या सह देवळा (खु) येथील नागरिक व महिला उपस्थीत होत्या.
COMMENTS