माजलगाव/भास्कर गिरी कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यावर माजलगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी द...
माजलगाव/भास्कर गिरी
कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यावर माजलगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दि 10 ऑगस्ट रोजी सकाळी धडक कार्यवाही करत दंड आकाराला. न प च्या कारवाई मुळे मास्क न वापरणाऱ्या मध्ये धांदल उडाली.
जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातही कोरोना पॉजेटीव्ह रुग्णनांची संख्या वाटत असताना अशा संकट काळाचे गांभीर्य न घेता मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 25 ते 30 जनावर कारवाई करत प्रत्येक 500 रुपये प्रमाणे दंड आकाराला तर काहींना सक्त ताकीद दिली.
या कारवाई मध्ये न प चे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे,संतोष घाडगे,भुजंग गायकवाड यांच्या सह न प कर्मचारी व पोलीस सहभागी होते.
COMMENTS