ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते संगम येथे सिमेंट रोडच्या कामाचा शुभारंभ
संतोष स्वामी। दिंद्रुड दि.8 (प्रतिनिधी) :-
माजलगाव मतदार संघातील डापकर वस्ती संगम येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी ग्रामविकास तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावतीने 25/15 अंतर्गत सदरील काम देण्यात आले होते. सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून शनिवारी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
भाजप सरकारच्या कार्यकाळात संगम ता.धारूर येथील डापकर वस्ती येथे सिमेंट रस्त्यासाठी 25/15 अंतर्गत रस्ता मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामविकास तथा पालकमंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यावतीने निधी देण्यात आला होता. सरपंच भगवानराव कांदे, उपसरपंच बळीराम डापकर, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन रायकर यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
गावापासून जवळच असलेल्या डापकर वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची या सिमेंट रस्त्यामुळे मोठी सोय होणार आहे. सदरील सिमेंट रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच भगवानराव कांदे, बंडुजी खांडेकर, उपसरपंच बळीराम डापकर, युवा नेते सचिन रायकर, नागेश ठोंबरे,आश्रुबाआण्णा तिकडे, आश्रुबाजी डापकर, बालासाहेब डापकर, मुंजा डापकर, प्रसाद डापकर, शंकर डापकर, गोविंद डापकर, वचीष्ठ कांदे, गोविंद केकान, प्रकाश महाराज कांदे,आनिल डापकर, ईश्वर डापकर आदी उपस्थित होते.
■ ओमप्रकाश शेटे यांचे योगदान.
या आगोदर या रस्त्याची दयनीय अवस्था होती. गुडघाभर पाणी व चिखलातून वस्तीवरील लोकांना ये जा करावी लागत असे. त्याठिकाणी रस्ता मजबुतीकरण करण्याचे काम ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नाने झाले आहे. वस्तीवरील लोकांची गैरसोय थांबल्यामुळे वस्तीवरील नागरिकांनी शेटे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरपंच कांदे यांनी त्यांचे आभार मानले.
COMMENTS