प्रा.डॉ माधव वाघमारे यांचे दुःखद निधन।
कुंडलवाडीपासून जवळच असलेेल्या मौजे अर्जापुर येथील रहीवाशी तथा धर्माबाद येथील लाल बहाद्दुर शास्री
महाविद्यालयातील मराठी विभागात तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ माधव वाघमारे यांचे दि.८ जुलै रोजी दुःखद निधन झाले असुन ते अत्यंत मन मिळावू होते. ५ जुलै रोजी दुचाकीवरुन गावाकडून नांदेडकडे जात असताना वाका पाटी ते कापसी गुंफा यामधील मुख्य महामार्गावर कारने धडक मारली.,त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान मृत्युशी झुंज देताना दि.८ जुलै रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दि.८ जुलै रोजी त्यांचे मुळ गावी मौजे अर्जापुर येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून त्यांच्यापश्चात पत्नी दोन मुली,आई-वडील,भाऊ असे परिवार असुन त्यांच्या दुःखद निधनाने नातलग, मित्र परिवार, प्राध्यापक वर्ग आदींमधुन हळहळ व्यक्त केली जात आहेे.
COMMENTS