- मास्क न लावता फिरणाऱ्यावर कारवाई करा - मनसे
धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री.दत्तात्रय कावडे यांनी केली आहे. नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री कावडे असे ही म्हणाले की, धर्माबाद शहरात सोशल डिस्टनसिंग चे पालन कुठे ही होताना दिसत नाही आणि जिल्ह्यात कोरोनाचा धोका तर वाढतच आहे. जर धर्माबाद मध्ये एखाद्याला कोरोना झाला तर पूर्ण तालुक्याला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ह्यासाठी जे लोक मास्क न लावता शहरात फिरत आहेत, त्यांना नगर परिषदेकडून 200 रुपये दंड लावून त्यांना तेथेच एक मास्क द्यावा. धर्माबाद शहरात 90 टक्के लोक मास्क शिवाय चालताना व गाड्यांवर फिरताना दिसतात, त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे हे गरजेचेच आहे. सायंकाळी पाच वाजल्याच्या नंतर सर्व दुकाने त्वरित बंद करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. कपड्यांच्या दुकानात व गोदामात ही सोशल डिस्टनसिंग वापर होताना दिसत नाही आणि कपड्यांच्या दुकाना जवळ असलेल्या जमावाकडून दंड वसूल करून दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसे अध्यक्ष श्री.दत्तात्रय कावडे यांनी केली आहे.
COMMENTS