मुंबई येथील राजगृहावर हल्ला करणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-मुंजाजी गोरे संस्थापक अध्यक्ष सावता सेना परभणी (प्रतिनिधी ) भारताचे संविध...
- मुंबई येथील राजगृहावर हल्ला करणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-मुंजाजी गोरे संस्थापक अध्यक्ष सावता सेना
परभणी (प्रतिनिधी )
भारताचे संविधान कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे राजगृह निवासस्थान आहे .हे आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान असून येथे जगभरातून पर्यटक येत असतात परंतु दिनांक 7 जुलै रोजी समाजकंटकांनी राजगृहावर हल्ला करून नासधूस केली या घटनेचा सावता सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून या घटनेतील पडद्यामागील सूत्रधार आणि आरोपींना तात्काळ अटक करावी .नाही केल्यास सावता सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी शासनावर राहील .आसा इशारा मुंजाजी गोरे
संस्थापक अध्यक्ष ,सावता सेना, महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
COMMENTS