""""""""""""""""""""""""""""""
धर्माबाद (अहमद लड्डा) पोलिस स्टेशन आणि नगर परिषद कार्यालय धर्माबाद येथे NBFC MFI क्रेडिट एँक्सेस ग्रामिन लि. या लघुवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून दि.06 जुलै राेजी एरिया मॅनेजर ज्ञानेश्वर कदम उंचाडकर, शाखा व्यवस्थापक मुंजाभाऊ खापरे यांनी धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा श्री सोहन के माचरे सर यांच्या हस्ते पोलिस कर्मचारी यांना आणि नगर परिषद येथे मुख्याधिकारी मा श्री मंगेश देवरे सर यांच्या हस्ते कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्क चे वाटप केले.
काेविड19 च्या महामारीच्या संकटाने महाराष्ट्रासह देशात काेराेनाच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामूळे सबंध देशभर काेहराम माजला आहे.त्यामूळे सबंध देशभर लॉकडाऊन सुरू अाहे आणि या काळात पोलिस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन व सफाई कामगार या संकट समयी मात्र अहाेरात्र परिश्रम घेत आहे.या कठिन परिस्थीतीत मानवतावादी सेवाभाव या दृष्टिकाेनातून क्रेडिट एँक्सेस ग्रामीण लि कडून धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा श्री सोहन के माचरे साहेब यांच्या हस्ते पोलिस कर्मचारी यांना आणि धर्माबाद नगर परिषद मुख्य अधिकारी मा श्री मंगेश देवरे सर यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयीन अधिकारी व सफाई कामगार यांना क्रेडिट एँक्सेस ग्रामीण लिमिटेड या लघुवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून एरिया मँनेजर ज्ञानेश्वर कदम उंचाडकर आणि शाखा व्यवस्थापक मुंजाभाऊ खापरे , सहाय्यक शाखा व्यवस्थापक मगदूम शेख तसेच सहकारी किरण हारके, सदाशिव बैलवड, प्रविण चव्हाण, निलेश देवकते,मारोती हरगे आणि आकाश सावरगावे यांच्यातर्फे सँनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
COMMENTS