_
दि. 8 जुलै 2020
*
* भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी
* हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची केली मागणी
* आंबेडकर कुटुंबियांना दिला पाठिंबा
- घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील "राजगृह" या निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी नुकत्याच केलेल्या भ्याड हल्ल्याचा मुंबई भाजपने तीव्र निषेध केला आहे. आंबेडकर कुटुंबियांना याप्रसंगी पाठिंबा देण्याकरता मुंबई भाजप अध्यक्ष श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज "राजगृह" ला भेट दिली. श्री. भीमराव आंबेडकर यांच्याशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली आणि त्यांनी दाखविलेल्या संयमाचे कौतुक केले.
"राजगृह"वर झालेल्या हल्ल्याचा मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री. मंगलप्रभात लोढा यांनी अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला असून सदर हीन कृत्यात सामील असलेल्या गुन्हेगारांना त्वरित अटक करावी तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मुंबई भाजप ठामपणे आंबेडकर कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. शासनाने "राजगृह"ची सुरक्षा तातडीने वाढवावी अशी मागणीही श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या घटनेमागे कोणाचा हात आहे किंवा काय षडयंत्र आहे, त्याची सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रक्षोभक घटनेनंतरही आंबेडकर कुटुंबीयांनी समाजाला जे शांततेचे आवाहन केले आणि जो संयम दाखवला तो अतिशय कौतुकास्पद आहे असे श्री. लोढा यांनी सांगितले.
यावेळी श्री. लोढा यांच्यासोबत माजी मंत्री श्री. भाई गिरकर, खासदार श्री. गोपाळ शेट्टी, आमदार श्री. सुनील राणे, भाजप मुंबई सचिव श्री. विजय पगारे, भाजप मुंबई अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. मयूर देवळेकर, भाजप दक्षिण मध्य जिल्ह्याध्यक्ष श्री. राजेश शिरवडकर हे उपस्थित होते.
COMMENTS