- आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्या मनुवादीस तत्काळ अटक करून कडक शासन करा --दत्ता कांबळे
कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे मुख्यमंत्री यांना निवेदन
माजलगाव :(प्रतिनिधी ): विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर दि . सातरोजी अज्ञातांकडून तोडफोड केले बद्दल जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी सदरील निवेदनात म्हटले आहे की , मुंबई येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ' राजगृहा'वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील मौल्यवान वास्तुसह कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण असून राजगृहावरील तोडफोडीने देशातील आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत .सदरील घटना ही आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाच्या भावना दुखावनारी व अशोभनिय आहे .
तसेच राजग्रूहावर झालेली तोडफोड ही केवळ राजग्रुहाची तोडफोड नव्हे तर समग्र आंबेडकरी चळवळीची तोडफोड असून या निंदनीय घटनेचा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे सदरील निवेदनात कॉंग्रेस अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी म्हटले आहे .तसेच आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्या मनुवादी विचाराश्रणीच्या गुन्हेगारास तत्काळ अटक करून , कडक शासन करण्यात यावे अन्यथा देशभरात असंतोष पसरेल याची गांभीर्याने दखल घ्यावी असे कॉंग्रेस अनु .जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .यावेळी सदरील निवेदन हे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात , कॅबिनेट मंत्री तथा अखिल भारतिय कॉंग्रेस अनु .जाती विभागाचे अध्यक्ष नामदार डॉ .नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे , कॉंग्रेस अनु .जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजयजी आंभोरे यांना प्रतीलीपी मध्ये माहितीसत्व सादर केले आहे .यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे सह , शहर अध्यक्ष शेख रशीद , अल्पसंख्यक शहर अध्यक्ष जानू शहा , प्रकाश कसबे , दत्ता कांबळे , राहुल जाधव सह कॉंग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते .
COMMENTS