* *शिक्षक नेते डी. सी. डुकरे अपघातात जखमी* परभणी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे परभणी जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षक नेते डी.सी डु...
- *
*शिक्षक नेते डी. सी. डुकरे अपघातात जखमी*
परभणी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे परभणी जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षक नेते डी.सी डुकरे यांच्या दुचाकीला दिनांक सात जुलै रोजी कुत्र्यांनी धडक दिली. डुकरे सर सकाळी शाळेत कडे जात असताना गल्लीतून काही कुत्रे मुख्य रस्त्याने धावत आल्याने त्यातील एक कुत्रा डुकरे यांच्या गाडी समोर येऊन धडकला. व गाडी धाडकन पडली. शिक्षक नेते डी.सी डुकरे यांच्या डाव्या गुडघ्याला व डाव्या खांद्याला इजा झाली असून पूर्णा येथे डॉक्टर विनय वाघमारे यांच्याकडे उपचार सुरु असून सर्वसाधारण मार लागला असल्याने समजते. डॉक्टरांनी सध्या त्यांना विश्रांतीची आवश्यकता असल्याने घरीच आराम करण्यास सांगितले.
COMMENTS