नांदेड जिल्ह्यात आज २७ बाधितांची भर; सहा व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी तर १ मृत्यू
नांदेड :- बुधवार ८ जुलै २०२० रोजी सायं ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण २७६ अहवालापैकी १९८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन २७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ५११ एवढी झाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार घेत असलेली सोनमल तांडा येथील ६५ वर्षाची महिलेचा ८ जुलै च्या मध्यरात्री १२.३० वाजता मृत्यू झाला. ३० जूनला या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता एकूण मृतांची संख्या आता २३ ईतकी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये काटकळंबा गावातील २४ वर्षे वयाचा १ पुरुष, सिडको येथील ३६ वर्षाचा १ पुरुष, सावित्रीबाई फुलेनगर येथील ३८ वर्षाचा १ पुरष, मुखेड तग्लीन गल्ली येथील ३४ वर्षे वयाचा १ पुरुष, देगलूर येथील फाजोदिन टॉकिज जवळील ४६ वर्षाचा १ पुरुष, परभणी जिल्ह्यातील वसा येथील ७० वर्षाचा १ पुरुष, बिलोली गांधीनगर येथील ३२ वर्षाचा १ पुरुष,किनवट तालुक्यातील गोकुंदा १८ व २० वर्षाचे २ पुरुष, मुक्रमाबाद येथील ४८ वर्षाचा १ पुरुष, नायगाव येथील बोंबनाले गल्लीतील अनुक्रमे ४०, ६०, ३१ वर्षाच्या ३ महिला, ७ व २ वर्षाचा २ मुली, ३८ व ४० वर्षाचे २ पुरुष व ६ वर्षाचा १ बालक, यशवंतनगर येथील ५२ वर्षाचा १ पुरुष, आंबडेकर नगर येथील २८ वर्षाचा १ पुरुष, देगलूरनाका येथील ६० वर्षाचा १ पुरुष, विजयनगर येथील ७५ वर्षाचा १ पुरुष, गणेशनगर येथील २१ वर्षाचा १ पुरुष व ४७ वर्षाची १ महिला हे बाधित झाले आहेत. सर्व बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज रोजी १४७ पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील १६ बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १४७ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ४५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ६०, तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे ८, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २ बाधित, जिल्हा रुग्णालय येथे ४ बाधित, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ७ बाधित तर हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे २ बाधित, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे १ बाधित तर किनवट कोविड केअर सेंटर येथे २, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १ बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ३ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.
कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १ बाधित व्यक्ती, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून १, व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथील २, हदगाव कोविड केअर सेंटर येथील १ बाधित तसेच मुखेड कोविड केअर सेंटर येथील १ बाधित व्यक्ती असे एकुण ६ बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३४१ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.
८ जुलै २०२० रोजी २३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४७ हजार ४५२,
घेतलेले स्वॅब- ७ हजार ४७८,
निगेटिव्ह स्वॅब- ६ हजार २३५,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ५३,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ५११,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- २२,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ०२,
मृत्यू संख्या- २३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ३४१,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- १४७,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची २३७ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS