सेलू (प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू असताना युरिया खतासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे फिजिकल डिस्टंसिंग फज्जा उडू नये या उद्देशाने सेलू चे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना योग्य अंतर ठेवून रांगेत उभे करून दुकानदारास खत वाटप करायला लावले .
सध्या शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी युरिया खताची आवश्यकता असल्याने व युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभा राहून खत विकत घ्यावे लागत आहे. या खतासाठी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोंढा भागातील खत विक्री दुकानावर एकच गर्दी केल्याने तसेच परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेबांनी संचार बंदी आदेश लागू केले असताना खतासाठी होणारी तोबा गर्दी आणि त्यामुळे होणाऱ्या फिजिकल डिस्टंसिंग चा फज्जा उडू नये व शेतकऱ्यांना देखील खत मिळावा या उद्देशाने सेलू तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी स्वतः खत विक्री दुकानावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य अंतर ठेवून रांगेत उभे केले. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना देखील खत मिळण्यास सोयीचे झाले, आणि संचारबंदी काळातदेखील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी तहसीलदार यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी एम. ए. आष्टीकर उपस्थित होते.
COMMENTS