धर्माबाद (अहमद लड्डा)येथील गुजराथी व मनमत आप्पा मित्रमंडळा तर्फे कार्या मध्ये तत्पर व सदैव कर्तव्यदक्ष चपळ आधिकारी, सर्वधर्मसमभाव, मनमिळाऊ, जनतेचे मने जिंकलेले व कोरोना काळात कोरोना योद्धा (कोरोना व्हॉलअर) म्हणून तत्पर सेवा देणारे पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले यांचा 40 वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वांना हातावर सेनिटायझरने हात स्वच्छ करून तोंडाला लावण्यत साठी मास वाटप करण्यत आले.
त्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ग्रामीण रुग्णालय कल्याण समितीचे सदस्य रमेश अण्णा गौड व एल. बी. एस .कॉलेज चे उपाध्यक्ष गंगाधर जी गुजराथी, जंगम समाजाचे अध्यक्ष मन्मत आप्पा स्वामी, मार्केट कमिटीचे माजी कोषाध्यक्ष प्रकाश जी गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सनगले यांनी वाढदिवसा निमित्त जनतेला सागितले की कोरोना च्या महामारी ला आपण स्वच्छ हात धुऊन व तोंडाला मास लावून या कोरोना महामारीला हरऊ शकतो असा संदेश दिला.
यावेळी येवती चे आदर्श शिक्षक शिवकुमार पाटील जयशेठ, बालाजी पाटील जवळेकर ,सतीश पाटील, पत्रकार बालाजी कुदाळे, अरुण गुजराथी, अनमोल वैद्य, ऋत्विक गुजराथी, गंगाधर मुनीम हे उपस्थित होते.
COMMENTS