प्रिय महेश करजगावकर साहेब*       *जन्मदिनाच्या शुभकामना...!*

* प्रिय महेश करजगावकर साहेब*       *जन्मदिनाच्या शुभकामना...!* *श्री महेश करजगावकर म्हणजे... आंग्ल भाषेचा सिद्धहस्त विद्वान ज्ञान, विद्वत्ता...


*प्रिय महेश करजगावकर साहेब* 


     *जन्मदिनाच्या शुभकामना...!*


*श्री महेश करजगावकर म्हणजे... आंग्ल भाषेचा सिद्धहस्त विद्वान ज्ञान, विद्वत्ता आणि शासन नियमाचा चालता बोलता ज्ञान कोष ...तसेच विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रातील हा एक अवलिया अधिकारी ... भीती , संकोच, भीड , भाड हे शब्द ज्याच्या* *शब्दकोशात अजून जन्मलेच नाहीत असे व्यक्तिमत्व ..!*


*आयुष्यभर अंगाखांद्यावर सोन्याच्या चिजा , वस्तू , आणि वैभव अक्षरशः रुळत असे .. विभागातील सर्वोच्च पदावरील अधिकारी, पदाधिकारी मिटिंग मध्ये काय म्हणतील याची कधीच तमा न बाळगणारा असा राज्यातील शिक्षण क्षेत्रातील एकमेव बेफिकीर अधिकारी... आम्ही इतर अधिकारी बोटात एखादी अंगठी जरी असली तरी मिटिंग मध्ये ती दिसू नये म्हणून धडपड करणारे पण हा बिनधास्त आणि निर्धास्त जगणारा आणि वागणारा अधिकारी......!*


     *वरवर वैभवी जीवन जगणारा हा आमचा मित्र मनाने मात्र अंतर्बाह्य चंदनासारखा निर्मळ, आणि सोज्वळ अधिकारी... कधी कुणावर विनाकारण संकट आलं तर अर्ध्यारात्री धावणारा आणि मदत करणारा असा लौकिक असणारा अधिकारी...! करजगावकर साहेबानी कधी कुणाचे ना टेन्शन घेतले ना कुणाला दिले...मात्र आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना नेहमी खुश ठेवणारा असा हा अधिकारी...त्यांच्यावर ही अनेक संकटे आली आणि गेली पण हा पठया कधी घाबरला नाही... महेश म्हणजे वरवर कणखर वाटणारा पण मृदू मनाचा दिलदार अधिकारी ... त्याच्या सोबत असलोत की खायला प्यायला कधी कमी पडणार नाही ...!*


   *आपल्या मित्र अधिकार्याबद्दल कधी कुणी पाठीमागे काही अपशब्द बोलले की हा वाघासारखा खवळून आणि चवताळून उठणार आणि म्हणणार अहो साहेब , असा पाठीमागून वार नाही करायचा ज्याच्यावर तुम्ही अपवर्तनाचा दोष लावलाय तो त्याच्या समोर लावायचा असं पाठीमागे टीका नाही करायची असं खनकावून सांगणार....*


  *मित्र असावा तर असा असावा आणि शत्रू देखील असावा तर असाच असावा...पुढे शिक्षण क्षेत्रात खूप काही सृजनशील कार्य करायची त्यांची इच्छा दिसते ,त्यात त्यांना यश मिळावे ही सदिच्छा ...!*


 *अशा या दिलदार मित्राला जन्मदिनाच्या शुभकामना....!*


                   *डॉ गोविंद नांदेडे*


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel