प्रभाग क्र.7 च्या नगरसेवकांचे नागरिकांनी सांगून ही दुर्लक्षच !
माजलगाव/प्रतिनिधी
शहरातील बंजारा नगर,प्रभाग क्र.7 मधील नागरिक हे वाढत्या दुर्गंधीने व नाल्यांचे घाण पाणी रस्त्यांवर साचत असल्यामुळे सदरच्या परिसरात प्रचंड दुर्गंध पसरला असून नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेळोवेळी नागरिकांनी सांगितले परंतु याकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे बंजारा नगर प्रभाग क्र.7 मधील नागरिकांनी शोशल डिसटंस ठेवून नगरपालिकेच्या कारभारा विरोधात बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
पावसाळ्याचे दिवसमान असल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी चिखल होत असल्याने येणारे-जाणारे वाहन खाली पडत आहेत.तर त्यामुळे दुखापत होत आहे.दि.20 जुलै रोजी नगरपालिकेच्या मार्फत वार्ड क्र.7 मधील स्वच्छता व नाल्यांची खोदकामासाठी जेसीबी पाठवण्यात आली परंतु येथील स्वच्छता व नाला खोदकाम न करता पूर्वीच्या कच्च्या रस्त्यांवर मधोमध मोठ मोठे अर्धवट खड्डे खोदून ठेवले आहेत त्यामुळे पूर्वीपेक्षाही सदरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.त्यासोबतचं प्रभागातील नागरिकांनी घेतलेले पाईपलाईनचे नळ फुटले आहेत.सदरचे काम चुकीचे होत असल्याबाबत संबधित जेसीबीचे चालकास लक्षात आणून दिली असता.तुम्ही मला सांगू नका नगरपालिकेत जावून तक्रार करा अशा उर्मट शब्दात नागरिकांना सुनावले.
तसेच येथील अँड अर्जुन आडे यांच्या घरापर्यंत अर्धवट नाली खोदकाम केल्यामुळे त्यांच्या घराच्या मागील सार्वजनिक शौचालयाचे पाणी, पावसाचे पाणी तसेच आसपासचे शौचालयांचे घाण पाणी खड्डयामध्ये साचून सदरचे दुर्गंधी युक्त पाणी आडे यांच्या घरामध्ये घुसत असून संपूर्ण प्रभागात दुर्गंधी पसरली आहे.साचलेल्या पाण्यामुळे डास,माशा बसून रोगराई पसरत आहे.पुर्ण चुकीच्या कामांमुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभागातील नागरिकांना जीवघेणे आजार होण्याची शक्यता आहे.सदर निवेदनावर अँड.अर्जुन आडे,धनराज आडे,देविदास राठोड,नवनाथ जाधव,विजय पवार, आशाबाई चव्हाण,रेणुका चव्हाण,रेश्मा राठोड, सीताबाई राठोड यांच्यासह आदी नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
--------------------------------
प्रभागातील खड्डे बुजवून तत्काळ त्यावर मुरूम टाकून तात्पुरता रस्ता रहदारी योग्य करण्यात यावा. प्रभागातील साचलेला कचरा नेण्यासाठी नियमित घंटागाडी पाठवण्यात यावी व नवीन सिमेंट रस्त्याचे काम करण्यात यावे.अन्यथा नगरपालिका कार्यालय समोर सोशल डिसटंसचे पालन करुन बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा बंजारा नगर,प्रभाग क्र.7 मधील नागरिकांनी दिला आहे.
COMMENTS