धर्माबाद :-(अहमद लड्डा) नुकत्याच जाहीर झालेल्या C.B.S.E. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरची विद्यार्थीनी ...
धर्माबाद :-(अहमद लड्डा) नुकत्याच जाहीर झालेल्या C.B.S.E. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरची विद्यार्थीनी कु. सानिका साईनाथ कामिनवार हिने 500 पैकी 459 म्हणजेच 91.80 % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे केंद्रीय मुख्याध्यापक माधवराव वारले, नासा येवतीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेषराव माडेवार, शिक्षक नेते अशोक कागेरू, बालाजी पेटेकर, बळीराम तोटावाड, राजकुमार जाधव, उदय शिल्लारे, नंदकुमार राजमल्ले यांनी तिचे अभिनंदन करून स्वागत केले आहे.
सानिकाने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांना, पालकांना व आपल्या कठोर परिश्रमास दिले आहे.
COMMENTS