धर्माबाद ( अहमद लड्डा )दि.१ऑगस्ट २०२० रोजी बहुजननायक,साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.
हा आनंदाचा दिवस आहे. परंतु, देशात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा आजार संसर्गजन्य असून त्याची लागण होण्याची भीती असल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हा दिवस साजरा न करता, घरीच राहून सोशल डिस्टंसिंग ठेवून साजरा करावा.
जिल्ह्यात कलम 144 लागू असून, संचारबंदी आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही. कायद्याचीदेखील पायमल्ली होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी.सध्याची परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होऊन फैलाव होण्याच्या भीतीमुळे, खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना साथ रोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात मोठा समुदाय आला तर संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे, अशा वेळी सर्वांनी घरीच राहून कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्याची ही वेळ आहे त्या मुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त दिनेश दारमोड यांनी केले आहे.
COMMENTS