दिंद्रुड ला नविन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज वाटप


 


 दिंद्रुड प्रतिनिधी 


 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड कृषक सेवा सहकारी सोसायटी त शुक्रवारी दुपारी नविन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाचे वाटप करण्यात आले.


 


दिंद्रुड व पंचक्रोशीतील नविन शेतकऱ्यांना दिंद्रुड कृषक सेवा सोसायटी च्या माध्यमातून ५७ हजार रुपयांचे क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज वाटप करण्यात आले.१५१ शेतकऱ्यांनी कागदोपत्री पुर्तता केल्या मुळे सदर शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँक बीड जिल्हा उपाध्यक्ष गोरख धुमाळ, कृषक सेवा सहकारी सोसायटी दिंद्रुड अध्यक्ष राम उबाळे,संचालक पांडुरंग झोडगे, माजी सरपंच दिलिप कोमटवार,संचालक दत्तात्रेय शिंदे,श्रीधर सांगळे, सचिव विष्णू पांचाळ,जिल्हा मध्यवर्ती दिंद्रुड शाखा व्यवस्थापक प्रभाकर भारती, अखिल सय्यद, रणजित रुपणर आदी मान्यवर उपस्थित होते.सेवा सहकारी सोसायटी कर्मचारी गुलाब हंगरगे,रविंद्र सोळंके,अशोक झोडगे उपस्थित होते.विठ्ठल महाजन, शरिफ सय्यद, पवन गवळी, गजानन महाराज आदी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज वाटप करण्यात आले.


टिप्पण्या