150 प्लॉट धारकांनी दिले मुख्याधिकाऱ्याना निवेदन
धर्माबाद(अहमद लड्डा) धर्माबाद येथील बासर रोडवर असलेल्या विनायक नगर व साई नगर मध्ये काहीच सुविधा नसल्यामुळे तेथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना गैरसोयीबद्दल निवेदन दिले आहे. 6 एप्रिल 2017 आणि 4 डिसेंबर 2019 रोजी या संदर्भात हा निवेदन देण्यात आला होते तरी ही नगर प्रशासनाकडून आतापर्यंत काहीही झाले नसल्याचे नमूद केले. म्हणूनच आज गुरुवारी तिसऱ्यांदा या ठिकाणच्या लोकांनी पुन्हा एकदा निवेदन दिले आहे. त्यात पथदिवे नसल्याचे सांगितले. त्यामुळे येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. येथे जागृत हनुमान मंदिरामुळे शुक्रवार आणि शनिवारी भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यामुळे भक्तीसाठी गर्दी होत असते. रस्ते नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चिखलातुनच यावे जावे लागते. या क्षणी, पावसाळ्याच्या दिवस असल्याने सर्व कांही वाटेवर वाहून जाते आणि निचरा न झाल्यामुळे पाणी इकडे-तिकडे जात राहते. विनायक नगर आणि साई नगर येथील नागरिक, शालेय विद्यार्थी व भाविकांसह येथे येणाऱ्या सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे 150 प्लॉट धारकांची मागणी अशी आहे की येथील परिस्थिती लक्षात घेता सिमेंटचे काँक्रीट रस्ते, नाले व पथदिव्यांची व्यवस्था करावी. ह्या निवेदनावर गणपत राजन्ना गडोड, पी जी कोटूरवार, प्रेम कुमार, सुभाष वारले, सिरपूरे दर्शन गणपत आणि राजेश्वर यांच्या स्वाक्षर्या आहेत.
COMMENTS