धर्माबाद मध्ये मुंबई च्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध
धर्माबाद (अहमद लड्डा) मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या धर्माबादमध्ये सर्वपक्षीय निषेध करण्यात आला आहे, हल्ला करणाऱ्यावर टाडा टाडा अधिनियम 1987 अधिनियम 3 व 4 नुसार कारवाई करण्यात यावी.ह्या विषयी आज उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र शेळके यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.ह्यावेळी राष्ट्रीय मराठा संघ चे तेलंगाणा प्रभारी संतोष ठाकरे, मराठा संघ चे तालुका अध्यक्ष छोटू पाटील बाभलीकर, अधिवक्ता राहुल सोनटेके, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉ सुधीर येलमे,बसपाचे युवा नेते वैजनाथ गजभारे, टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नवीद अहमद, पत्रकार तुरेराव आणि मारोती झांपलवार आणि संजय उमडे उपस्थित होते. ह्याच विषय मध्ये भीम शक्ती चे ही निवेदन देण्यात आले. तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी तहसीलदार श्री दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्यात यावी असे नमूद केले, यांच्या सोबत उपाध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, कार्यकर्ता माधव पांगरीकर आणि नगरसेवक देविदास बिपटवार हे उपस्थित होते.
COMMENTS