बळजबरी करत वसुली करणा-या बॅंक कर्मचारयावर कार्रवाही करा - पी.जी. कोटुरवार , नांदेड जिल्हाध्यक्ष मराठवाडा विद्यार्थी संघटना* 

*लाॅकडाउन काळात महिलांनी महिला बचत गटाने घेतलेले वेगवेगळ्या बँक , फायनान्सचे कर्ज वसुली साठी बँक कर्मचारी बळजबरी करत वसुली करणा-या बॅंक कर्...

*लाॅकडाउन काळात महिलांनी महिला बचत गटाने घेतलेले वेगवेगळ्या बँक , फायनान्सचे कर्ज वसुली साठी बँक कर्मचारी बळजबरी करत वसुली करणा-या बॅंक कर्मचारयावर कार्रवाही करा - पी.जी. कोटुरवार , नांदेड जिल्हाध्यक्ष मराठवाडा विद्यार्थी संघटना* 



 


धर्माबाद (अहमद लड्डा) नांदेड जिल्हातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हातील अनेक महिलांनी महिला बचत गटाने घेतलेले वेगवेगळ्या बँक , फायनान्सचे कर्ज वसुली साठी बँक कर्मचारी यांचेकडून वारंवार तगादा लावला जात आहे. बँकांच्या माध्यमातून वाटप केलेले कर्ज व सर्व फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावू नये अशा सुचना मुख्यमंत्री साहेब यांनी करूनही अनेक बँकेचे, फायनान्सचे कर्मचारी घरोघरी जाऊन महिला बचत गटांच्या मिटिंगा घेवून हप्ते भरण्यासाठी सक्ती करत आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत. नांदेड जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गटला वेगवेळ्या फायनान्सने,बँकांनी कर्ज वाटप केले आहे .सध्या कोरोना महामारीच्या साथीमुळे जिल्हातील अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे महिला वर्गाचे तसेच इतर लोकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे शासनाने यासंदर्भात बँका व फायनान्स तसेच वाहनांचे,इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर कर्ज, वाहन कर्ज इत्यादींच्या ई एमआय वसुलीसाठी सक्ती करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. असे असताना शासनाचे आदेश पालन न करता बँका व व फायनान्स अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी वारंवार महिलांना व इतर लोकांना त्रास देत आहेत. जिल्हातील बंधन बँक, बुलढाणा बँक, समर्थ बँक,एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, मान देशी महिला बँक, म्हसवड बैंक एक विटास फायनान्स, फॅबटेक पतसंस्था ग्रामशक्ती फायनान्स आशीर्वाद फायनान्स, सप्तशृंगी फायनान्स सूर्योदय फायनान्स, बजाज फायनान्स ,मायक्रो फायनान्स व बँका यांच्याकडून महिला बचत गटाने घेतलेले कर्जाची वसुली थांबवण्यासाठी पोलिस प्रषासन, वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, जिल्हा अधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी मराठवाडा विद्यार्थी संघटनेने केली आहे.


 या पुढे तालुक्यातील बँक, फायनान्सचे अधिकारी, कर्मचारी कर्ज वसुलीसाठी घरोघरी मिंटीगा घेत असल्याचे अढळून अल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ५१ व ५५ तसेच साथरोग प्रतिबंध १८९७ अन्वये व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार व महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम २०२० मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात यावी. असे निवेदन पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांना मराठवाडा विद्यार्थी संघटनेचे नांदेड जिल्हाअध्यक्ष पी.जी. कोटुरवार यांनी केली आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group